जुन्या घराच्या कामानिमीत्ताने काही दिवसा आधी मुंबईला गेलो होतो. सेमिनार असल्याने पाच ते सहा दिवसात काम आटपून पुन्हा संभाजीनगरीत (औरंगाबाद) घरी यायचं होतं.
संध्याकाळची वेळ, मी मुंबईत पोहोचतो न पोहोचतो तोच संभाजीनगर (औरंगाबाद) च्या एका मित्राचा फोन आला.
'आरे परशा मुंबईत पोचला का.. आरे ते हॉटेलची बुकिंग कनफर्म झालीय का रं..बघुन सांग ना एकदा. तिथं फोन लागत नाये तर पाय ना जरा कनफर्म झालंय का त्ये'
'हो आताच घरी पोहोचलो, उद्या सकाळी जाऊन पाहतो, तुला कॉल करतो..बघ पोहोचून'
'ओके' म्हणत त्याने फोन ठेवला.
संभाजीनगर (औरंगाबाद) चा खास जिगरी मित्र, आडनावाने जोश्या आणि पेशाने वकील.
कोर्टाच्या कामा निमित्त संभाजीनगर वरून मुंबईत येणार होता. त्याला लगेचच दुसऱ्यादिवशीची तारीख मिळाल्याने मुंबईत मुक्काम करणं त्याला अनिवार्य होतं.
कोर्ट नरीमन पॉईंट भागात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी परत कोर्टात यायचे असल्याने नरीमन पॉईंटच्या जवळपास बजेटमधे त्याने हॉटेल बुकिंग केलेली होती. दोन दिवसासाठीची त्याला कन्फ़र्म बुकिंग मिळाली नव्हती. आणि मोबाईलच्या तांत्रिक अडचणीमुळे हॉटेलचा संपर्क गहाळ झाला होता. त्याच बुकिंग स्टेटस जाणून घेण्यासाठी मला कुलाब्यातल्या त्या हॉटेलमधे जाव लागणार होतं.
माझं सगळं बालपण मुंबईत गेलं असल्याने मुंबईतल्या गल्यानबोळ्या कपारकचाट्या मी खुप चांगल्या जाणून होतो. रोजच्या वापरात गाडी संभाजीनगरीत असल्याने मित्राची गाडी घेऊन मी दुसर्या दिवशी दुपारच्या बारा वाजताच्या आसपास सायन एक्सप्रेस हायवे धरून रस्ता काढत अगदी तासाभरात दुपारच्या दोन ते तीन वाजेपर्यंत कुलाब्यात पोचलो.
वडीलोपार्जी मुंबईतल्या जुन्या प्रॉपर्टी मुळे माझ्या औरंगाबाद-मुंबई वार्या नेहमीच होत असतात. पण कुलाब्यात वावर कमी झाला होता जवळ जवळ ते नाहीच्याच बरोबर. त्या दिवशी अगदी सात वर्षांनंतर मी कुलाब्यात पाय ठेवला होता. कुलाब्याला अजून एक नाव 'बॉम्बे नंबर पाँच' यामागे कारण हे की याचा पिनकोड 400005 आहे. कुलाब्यातल्या त्या इंग्रज काळातल्या इमारती, तिथे फिरणारे परदेशी नागरिक यांनी ते वातावरण आधीच इंग्रजाळलेलं असतं. दुपारच्या साडे तीन वाजता मी इच्छित स्थळी पोचलो. मी हॉटेल समोर पोहोचताच हॉटेलची इमारत एकदा निरखून पहिली.
ईंग्रजांच्या काळातली आजुबाजूला ती कौलारू घरे, बाहेर एकाबाजूला छोट्या छोट्या चड्ड्या घालून कोल्ड्रिंक सारखं दिसणारं काही तरी पीत आणि सिगारेटी फुंकत बसलेल्या त्या तांबड्या केसांच्या परदेशी महिला आणि दुसऱ्याबाजूला इमारतीच्या भिंतींवर स्प्रे पेंटिंगने रंगवलेली भारतीय संस्कृतीची भडक चित्रे यामधून वाट काढत मी रिसेप्शन पर्यंत पोचलो.
रिसेप्शन टेबलावर चेकइन साठी चक्क लाईन होती. एक ब्रिटीश मुलगा आणि मुलगी थांबलेले चेक ईन करत होते. त्यांच्या मागे अजून एक विदेशी तरुण रांगेत उभा होता. मी त्याच्या मागे जाऊन उभा राहिलो. रिसेप्शनीस्ट असणारी भारतीय तरुणी त्या जोडप्याशी अस्खलित इंग्रजीत बोलत त्यांना जवळपासच्या ठिकाणांची माहिती देत होती. त्यांचा सोपस्कार उरकून झाल्यावर माझ्यापुढे उभा असलेला तरुण पुढे गेला. त्या रिसेप्शनीस्ट मुलीने हसून त्याच स्वागत केलं आणि त्याच्याशी इंग्रजीमध्ये बोलायला सुरुवात केली. त्यावर तो तरुण लगेच म्हणाला “No English.. French.. French..!”. मुलीने स्मितहस्य करून त्याला थांबायला सांगितलं. फोन करून वरच्या मजल्याहून एका मुलीला बोलावून घेतलं. आलेली मुलगी देखील भारतीयच होती पण तिने आल्याबरोबर चार्ज घेतला आणि त्या विदेशी तरुणासोबत फ्रेंच मध्ये संवाद साधू लागली. मला आश्चर्य आणि कौतुक पण वाटलं. आपल्या देशात, आपल्या हॉटेल मध्ये परदेशी नागरिक येतात त्यांच्या सोयीचं व्हावं. त्यांना परकं वाटू नये म्हणून हॉटेलवाल्यांना किती ही काळजी !
त्यांचं उरकलं एकदाचं.. आणि मी पुढे रिसेप्शन जवळ आलो. रिसेप्शनीस्टने माझं हसून स्वागत केलं आणि तिच्या नेहमीच्या औपचारिक इंग्रजीत मला “Sir..! Your Name, Adress and Contact Number Please” असं म्हणून रजिस्टर माझ्यापुढे सरकवलं. मी तसाच उभा राहून तिच्या तोंडाकडे पाहू लागल्यावर, मला कदाचित ऐकू आलं नसावं असं समजून तिने मला पुन्हा सावकाश समजावून सांगितलं. “Sir..! Please register your Name, Adress and Contact number in.. तिचं वाक्य मध्येच तोडत मी लगेच म्हणालो, “No English.. Marathi.. Marathi..!” माझं बोलणं ऐकून ती शेजारी बसलेल्या तरुणाकडे पाहू लागली. तो दुसरा रिसेप्शनीस्ट तरुण तत्परतेने उठला आणि मला त्या मुलीने सांगितलेल्या सूचना हिंदीत समजावू लागला. मी त्याला स्पष्ट केलं की. “बाबा रे, मला हिंदी देखील येत नाही कृपया माझ्याशी मराठीत बोल.” आता मात्र त्या दोघांनी कपाळावर आठ्या आणून एकमेकांकडे पंचाईत झाल्यासारखे पाहिलं आणि कुत्सितपणे हसू लागले. पण मी माझ्या चेहऱ्यावरचा स्थितप्रज्ञ भाव जराही कळू न देता, आणि माझ्या नजरेतला ठामपणा जराही कमी होऊ न देता त्यांच्याकडे एकटक पाहत तसाच उभा राहिलो. माझ्याकडे पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालं. त्या मुलाने हाताचे इशारे करत हिंदीतून सावकाशरित्या समजावण्याचा प्रयत्न केला पण मी शांतपणे तसाच उभा राहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा काही ऐकणार नाही. त्या दोघांनी एकमेकांत चर्चा करून माझ्याशी मराठीत बोलण्यासाठी एका मुलाला फोन करून बोलावून घेतलं. महाराष्ट्रात मराठीतून समजावण्यासाठीचा त्यांचा खटाटोप पाहून मी थक्क झालो होतो. त्या मुलाला यायला तब्बल १५ मिनिटं लागली. तोपर्यंत माझ्यामागून ब्रिटीश, जर्मन, फ्रेंच सगळे त्यांच्या स्वतःच्या भाषेत बोलून एका मागून एक निघून जात होते आणि मी माझ्या महाराष्ट्राच्या राजधानीत, तेही कुलाब्यासारख्या जुन्या मुंबई भागात, मराठीतून बोलण्यासाठी.. सोफ्याच्या एका कोपऱ्यावर, हातावर हात ठेऊन, चुतीया सारखा, येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या तोंडाकडे बघत होतो.

आपल्यामुळेच आणि आपल्यासारख्या कित्येकांच्या नालायकपणामुळे झालेल्या मराठीच्या दयनीय अवस्थेकडे षंढासारखा बघत मराठी समजणारा कोणीतरी भेटवा म्हणून वाट बघत होतो. शेवटी त्यांनी बोलावलेला मराठी मुलगा आला आणि शेवटी मी त्याला मित्राची बुकिंग डिटेल मागितली. त्याला मी मराठी येणारी एक तरी व्यक्ती रिसेप्शनवर न ठेवल्याबद्दल विचारलं तर म्हणे “साहेब, रिसेप्शनला मुलगी दाक्षिणात्य आहे आणि मुलगा उत्तर भारतीय, त्यांना इंग्रजी- हिंदी येते. कधी मराठी बोलायची गरजच पडत नाही.”
त्याच्या 'गरज पडत नाही' या वाक्यावर मी बर्याच वेळ विचार करत होतो. कारण, मराठी भाषा बोलायची गरज पडत नाही ? हे मी कुठे ऐकतोय ? मुंबईत ? त्या मुंबईत ज्या मुंबईला महाराष्ट्रात घेण्यासाठी १०७ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या मुंबईत ??. 'राजधानी मुंबईतून आपली मराठी मातृभाषा तडीपार तर होत नाहीये ?' हा विचार मनात आला आणि वीजेच्या वेगाने अंगावर काटा येऊन गेला, मी राहत्या औरंगाबादेत तर जवळ जवळ मराठी भाषा हत्ती गेला फक्त शेपूट बाकी राहील्या प्रमाणे परिस्थिति आहे. उपराजधानी नागपूर मधून मराठी तडीपार होत आहे, शैक्षणिक राजधानी पुण्यात याहून काही वेगळी परिस्थिती नाहीये. बलिदान देणारे आपलं काम चोख बजावून गेले आणि त्यांचा वारसा सांगणारे आपण आपल्याच राज्यात इतर राज्याच्या आणि इतर देशांच्या भाषा कुरवाळत बसलोय.
मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत ऐकतोय कि इथे मराठी बोलायची गरज पडत नाही...! परदेशी नागरिकाला गरज वाटू नये इतपत समजू शकतो. पण महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना, महाराष्ट्रात नोकऱ्या करत असताना त्या रिसेप्शन वरच्या मुलीला आणि मुलाला मराठी शिकण्याची गरज वाटत नाही ? या सर्वाला ही गैरमराठी मंडळी जबाबदार नसून आपण मराठी महाराष्ट्रीय स्वतः जबाबदार आहोत. मोठ्या हॉटेलात, सिनेमागृहात, चकचकीत मॉलमधल्या पाश्चिमात्य नावं असलेल्या दुकानांमध्ये, कुठेही मराठी बोललं की आपल्याला कमी,गावंढळ किंवा मागासलेलं समजलं जाईल का ? मराठीतून बोललं की टॅक्सीवाला थांबेल की नाही ? मराठीतुन बोललं की भाजीवाला भैय्या कशी वागणूक देईल ? अशी मराठी माणसाचीच मानसिकता होऊन बसलीये. इंग्रजी बोलला म्हणजे भारी, हिंदी बोलला म्हणजे मध्यम आणि मराठी बोलला म्हणजे कमी, मागासलेला ? ते हिंदी भाषिक म्हणजे इंग्रजांचे गुलाम आणि आपण मराठी भाषिक हिंदी भाषिकांचे म्हणजे गुलामांचे गुलाम .
तरीही अजून पण वेळ गेलेली नाही. मराठीतून बोला, आपल्या घरच्यांना, मित्रांना, नातेवाईकांना मराठीतूनच बोलायला प्रवृत्त करा.
परभाषिक महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांना हे पण लक्षात येऊ दे की महाराष्ट्रात येऊन पोट भरायचे असेल तर कमीत कमी मराठी येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात जिथे कुठे जाल तिथे फक्त मराठीचा आग्रह धरा, कुणी मराठी बोलत असेल तर त्यांना प्रोत्साहन द्या. नाहीतर आज मराठी बोलल्यावर फक्त हसलं जातंय. आपण जर असेच वागत राहिलो तर मला वाटतं कदाचित भविष्यात आपल्या पुढच्या पिढीने मराठी बोलल्यावर एखाद्या टॅक्सीवाल्याने, एखाद्या दुकानदाराने “मराठी छोड..हिंदी में बात करो रे !” म्हणायला नको म्हणजे झालं.
महाराष्ट्रात मराठीतूनच बोला, इतरांना मराठीत बोलायला प्रवृत्त करा, आपल्याच राज्यात परके होऊ नका. वगैरे आपण नेहमी फेसबुक इत्यादीवर वाचतो, ऐकतो आणि तिथेच विसरून जातो पण त्याची झळ जेव्हा आपल्यापर्यंत येते तेव्हा त्याचे गांभीर्य जाणवू लागते. जेव्हा मराठी बोलल्यामुळे आपल्याला हीन वागणूक मिळते तेव्हा आपले डोळे खाडकन उघडतात. (किमान ज्यांची मराठी अस्मिता थोडीफार जिवंत आहे त्यांचे तरी उघडतात.)
@प्रसाद_माने

Copyright (c) 2015-23 Fast News Convergence and Syndication Ltd