बर्याच वर्षांनंतर कॉलेजचा मित्र मुंबई वरून औरंगाबादेत येणार होता म्हणुन दुपार पर्यंत सेमिनार आटपून रेल्वे स्टेशनला येऊन थांबलो. मुंबईहून निघालेल्या जनशताब्दीला येण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस मिनीट बाकी होते. ट्रेनची वाट पहात तिकीट काऊंटरला लागून असलेल्या एंट्रेंसवर येऊन मी ऊभा राहीलो.
'भैया दोन मिनीटं प्येन मिळल का ?'.
मी विचार करत माझ्या खिशाला लावलेला पेन काढत त्याला दिला.
'न विसरता परत दे', मी म्हणालो.
आजुबाजूच्या गर्दीकडे नजर टाकत मी पुन्हा ट्रेन येण्याची वाट पहात उभा राहीलो. मी एक नजर त्याच्याकडे टाकली. मला वाटलं, रिजर्वेशन फॉर्म भरण्यासाठी त्याने मला पेन मागितला पण त्याने हातात असलेल्या एका रजिस्टरचं पान फाडलं आणि लिहू लागला. बोटात गाडीची किल्ली फिरवत आजुबाजूच्या गर्दीत नजर टाकत मी उभा होतो.
'आरे उद्या दिवटीये रे मला..'
तो फोनवर बोलताना त्याच्या त्या मोठ्या आवाजाने पुन्हा माझी नजर त्याच्यावर पडली. पेन घेण्यासाठी मी त्याच्या जवळ गेलो जवळ जाऊन पाहील्यावर लक्षात आलं रिजर्वेशन कोट्याला इंग्लिश मधे निवेदन पत्र लिहीणं चालू होतं.
त्याच्या फोनवरच्या त्या ऐकलेल्या शब्दांवरून मी त्याला विचारलं,
'कुठे आहे सर्विस ला ?'
'मी कोर्टात आसतो स्टेनोग्राफर' तो म्हणाला.
'अरे वा छान' मी म्हणालो.
तीथेच उभा राहून त्याचा लिहीलेला मजकूर पाहू लागलो. सुरूवातीच्या तीन-चार ओळी लिहील्या होत्या आणि पुढे लिहीता लिहीता तो अचानक थांबला. खिशातून मोबाईल काढला आणि 'unfortunately' शब्द पाहू लागला. त्याची ती हालचाल पाहून मी म्हणालो, 'काय झालं ?'
'काय नाय.. ते जरा नेटवर स्पेलिंग बघत व्हतो' म्हणत दोन सेकंद थांबून माझ्याकडे नजर टाकत 'जाऊद्या हिंदीतच लिहीतो' म्हणत त्याने लिहीलेला कागद चुरगाळला आणि खाली टाकला. निवेदन पत्र लिहीताना त्याच्या हातात असलेल्या ओळपत्रावरील नाव वाचल्यावर लक्षात आलं त्याच्यावर 'आरक्षणा ची कृपा' झालेली होती. परिक्षा देऊन सर्विसला लागलेल्या एका सरकारी कर्मचार्याला 'unfortunately' शब्दाची स्पेलिंग न येणे म्हणजे विशेष आहे.
माझा एक वर्गमित्र होता ज्याने दहावीला 90 टक्के आणि बारावीला 91 टक्के मिळवलेला. घरात अस्थमाग्रस्त आई आणि लहाण बहीण. कपड्याच्या दुकानात काम करत, शिक्षण घेत होता. बहीणीच्या लग्नाची जबाबदारी घेऊन. सोबत शिकता शिकता स्पर्धा परीक्षा देत होता. 'ओपन कॅटेगरी' मधून असल्याने 1 अन् 2 मार्कांनी हुकत राहीला. गरीब परिस्थितितून बाहेर येऊन विकास करण्यासाठी माणसाला खरोखर आरक्षणाची गरज असेल तर..?
आज ही जेव्हा औरंगाबादच्या पैठण गेट च्या आवारात कामानिमित्त जाण होतं तेव्हा तिथे असलेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत परिस्थितिला धरून धडपड करणारे विद्यार्थी किती असतील या एका विचाराने डोळ्यांना टक लागते आणि मनात विचार फिरतो की, 'माणसाच्या विकासासाठी आरक्षण असावे ते जातीच्या की, उत्पन्नाच्या दाखल्यावरून ?'
आज ही जेव्हा औरंगाबादच्या पैठण गेट च्या आवारात कामानिमित्त जाण होतं तेव्हा तिथे असलेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीत परिस्थितिला धरून धडपड करणारे विद्यार्थी किती असतील या एका विचाराने डोळ्यांना टक लागते आणि मनात विचार फिरतो की, 'माणसाच्या विकासासाठी आरक्षण असावे ते जातीच्या की, उत्पन्नाच्या दाखल्यावरून ?'